Ration Card Update आनंदाच्या शिधातील हरभरा डाळ न मिळाल्याने शिधापत्रिकाधारक नाराजीचा सूर ओढत आहेत. डाळ खराब आल्याने त्याचे वाटप न करण्याची भूमिका दुकानदारांची असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शाहूनगर, चिंचवड येथील नागरिकांनी तक्रारीही केल्या. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिधापत्रिका कार्यालयाच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटपाची जुलै २०२४ मध्ये घोषणा झाली. कोट्यवधी रुपयांच्या खर्चास मंजुरीही मिळाली. सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत वाटप करण्याचे नियोजन देखील झाले होते. सारे काही ठरले मात्र कागदावरच. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीला विलंब झाला होता. गणेशोत्सव संपला तरी केवळ ४० टक्केच वाटप झाल्याची स्थिती होती
Ration Card Update नंतर दिवाळीत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्याचे वाटप करण्यात आले नाही. मात्र, त्याआधीच्या आनंदाच्या शिधात साखर, रवा, हरभरा डाळ व तेल (प्रत्येकी एक किलो) अशा चार वस्तूंचा समावेश होता. या उपक्रमाअंतर्गत पात्र कुटुंबांना केवळ १०० रुपयांत हे मिळणार होते.
Ration Card Update दुकानदारांकडून नकारघंटा
पिंपरी-चिंचवड शहरात साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. शिधापत्रिकाधारक शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आनंदाचा शिधा घ्यायला गेल्यानंतर त्यांना साखर, रवा व तेल वाटप केले. मात्र, हरभरा डाळ वाटपाला नकार घंटा दिली.
Ration Card Update आनंदाच्या शिधामधील तीन वस्तू मिळाल्या. मात्र हरभरा डाळ सडकी असल्याचे सांगून दुकानदारांना दिली नाही. याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. केवळ बघू, देतो, एवढेच आश्वासन त्यांनी दिले.
– देवेंद्र मेहता, शिधापत्रिकाधारक, शाहूनगर
Ration Card Update सर्व शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा प्रयत्न केला आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे किंवा खराब डाळीमुळे काही जण वंचित राहिले असतील, तर अशा नागरिकांनी संघटनेला कळवावे. त्यानुसार, संबंधित दुकानदाराकडे पाठपुरावा करून धान्य मिळवून देऊ.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स असोसिएशन
Ration Card Update नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार, मी संबंधित चिंचवड विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक घेऊन डाळ देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील कार्यवाही करायला सांगतो.
– प्रशांत खताळ, अन्न धान्य वितरण अधिकारी ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स असोसिएशन